रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लबचे अभियान ; चोपडा तालुक्यातील १२ शाळांमध्ये १५०० सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक व वह्यांचे वितरण’

प्रतिनिधी विनायक पाटील
‘रोटरी क्लब, चोपडा व रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन लेखन अभियान’ राबविण्यात आले, यात चोपडा शहर व तालुक्यातील १२ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक व वह्या आदी साहित्याचे मोफत वितरण झाले.प्राथमिक शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुस्तकातून चित्राच्या सहाय्याने आकलन क्षमता बळकट होण्यासाठी मदत होते, तसेच मराठी अक्षरे लिहिता वाचता यावीत, सोप्या भाषेत अक्षर व अंक ओळख सुलभ व्हावी व प्रामुख्याने विद्यार्थी पुर्णपणे साक्षर व्हावा या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.उजळणी पुस्तक व वह्या वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन शहरातील महिला मंडळ शाळेत करण्यात आले, यावेळी विचारपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख दीप अग्रवाल, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, प्रकल्प प्रमुख प्रा.दिव्यांक सावंत, रोटरी क्लबचे सदस्य रूपेश पाटील, स्वप्निल महाजन, विलास पी.पाटील, विलास एस पाटील, नयन महाजन, डाॅ.ईश्वर सौंदाणकर, चंद्रशेखर साखरे, मयुरेश जैन, संजय बारी, शाळेचे मुख्याध्यापक अरूण संदानशिव आदी मान्यवरांच्या हस्ते उजळणी पुस्तके व वह्यांचे वितरण करण्यात आले.तद्नंतर ३ दिवसाच्या कालावधीत महीला मंडळ प्राथमिक विद्यालय, चोपडा, जि.प केंद्र शाळा, निमगव्हाण, जि.प प्राथमिक शाळा, तांदलवाडी, जि.प प्राथमिक शाळा, खडगाव, जि.प उच्च प्राथमिक शाळा, माचला, जि.प प्राथमिक मराठी मुलींची शाळा, अडावद, जि.प.प्राथमिक शाळा उनपदेव, जि.प केंद्र शाळा, चौगाव या शाळांमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन साहित्याचे वाटप केले, या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वच शाळांनी रोटरॅक्ट क्लब व रोटरी क्लब यांचे आभार मानले.
