लासूर येथे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने बक्षीस वितरण
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती निमित्त उपक्रम
चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
चोपडा – लासूर येथील महिला भगिनी व विद्यार्थीनी यांच्या साठी विवाहित महिला गट व अविवाहित मुलीचा गट अश्या दोन गटात क्रांतिज्योती सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षाचे आयोजन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांचे वतीने करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी माळी समाज मंगल कार्यालय लासूर येथे जळगाव येथील सिद्धिविनायक फॉउंडेशन च्या संचालक, सह सचिव डॉ अमृता सोनवणे व अमळनेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सचिव भारती चव्हाण यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
सदर स्पर्धेत विवाहित गटात प्रथम डॉ भावना राजेंद्र महाजन, द्वितीय शुभांगी सचिन माळी, तृतीय शितल विनोद महाजन, अविवाहित गटात प्रथम गायत्री धनराज पिंगळे(सोनार), द्वितीय नेहा दगडू सोनगिरे, भूमिका विजय मगरे, प्रांजल भिवसन माळी, तृतीय रोशनी संजय माळी, आश्विनी भिकन महाजन तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर त्यांच्या जिवन कार्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम प्रियंका दिपक महाजन, द्वितीय नागेश प्रमोद वाघ, तृतीय सोहम विजय पाटील यांना पारितोषिक मिळाले
त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासूर चे माजी लोकनियुक्त सरपंच जनाबाई सुकदेव माळी हे होते प्रमुख अतिथी म्हणून क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के गंभीर सर, संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन कैलास महाजन सर, व्हा चेअरमन जागृती महाजन, संचालक एच एच माळी सर,माजी तज्ञ संचालक किरण धामणे, माऊली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ भावना महाजन, उपाध्यक्षा देवकाबाई महाजन, सचिव चंद्रकला माळी, सह सचिव जयश्री महाजन, वि का सो सा चेअरमन योगेश पाटील, व्हा चेअरमन प्रकाश माळी, माजी चेअरमन सुरेश माळी, पीक संरक्षण सो सा चेअरमन वासुदेव माळी, माजी सरपंच देवीलाल बाविस्कर, माळी समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष रामकृष्ण माळी, सचिव सुरेश पवार, सह सचिव अरुण माळी, किसान विद्या प्रसारक मंडळाचे सचिव विक्रम माळी,शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष नंदलाल माळी, सोनल राजकुळे, योगेश महाजन तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत विवाहित गटासाठी बक्षीस प्रथम पारितोषिक रु २५००/- किंमतीची पैठणी साडी संत सावता महाराज पतसंस्थेचे चेअरमन कैलास शालिग्राम महाजन सर यांचे कडून, तर द्वितीय पारितोषिक रु १८००/- किंमती चा प्रेशर कुकर संत सावता महाराज पतसंस्थेचे व्हा.चेअरमन जागृती राजेंद्र महाजन यांचे कडून, व तृतीय पारितोषिक रु.१३००/- रु किमती चा ५ डब्याचा (स्टील) चा सेट जि. प. शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नंदलाल सीताराम माळी यांचे कडून तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५ स्पर्धकांना भेटवस्तू चोपडा तापी सहकारी सूतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ यांचे कडून देण्यात येत आहे.
तसेच अविवाहित गटासाठी बक्षीस प्रथम पारितोषिक रु २५००/- किंमतीची पैठणी साडी संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक मा.श्री एच एच माळी सर यांचे कडून, द्वितीय पारितोषिक रु १८००/- किंमती चा प्रेशर कुकर लासूर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री सुरेश पवार यांचे कडून, व तृतीय पारितोषिक रु.१३००/- रु किमती चा ५ डब्याचा (स्टील) चा सेट SBI ग्राहक सेवा केंद्राचे संचालक मा.श्री निलेश ज्ञानेश्वर राजकुळे व सोनल निलेश राजकुळे यांचे कडून तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक ५ स्पर्धकांना भेटवस्तू चोपडा तापी सहकारी सूतगिरणी चे संचालक अमृतराव वाघ यांचे कडून देण्यात आले
तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु १५०१/- वि. का. सोसायटी लासूर चे माजी चेअरमन सुरेश उत्तम माळी यांचे कडून, द्वितीय पारितोषिक रोख रु ११०१/- प्रभू कृषी केंद्र, लासूर चे संचालक नरेंद्र रघुनाथ महाजन यांचे कडून व तृतीय पारितोषिक रोख रु.७०१/- सामाजिक कार्यकर्ते किरण कांतीलाल धामणे, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मातोश्री ऍग्रो चे संचालक योगेश सुधाकर महाजन यांचे कडून व सहभागी सर्व महिला भगिनी व विद्यार्थीनीना प्रमाणपत्र देण्यात आली
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी व सूत्रसंचालन सदस्य प्रेमराज शेलकर व आभार सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज विकास मंडळाचे संचालक मास्टर टेलर्स, युवक संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र माळी, भुमेश्वर मगरे, पवन महाजन, महेश माळी, कल्पेश माळी, अमोल गंभीर, निलेश राजकुळे, आर डी महाजन, समाधान महाजन, राहुल मगरे, योगेश माळी तसेच युवक मित्र यांनी परिश्रम घेतले.