महाराष्ट्र

लिटल स्टार प्रायमरी स्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

गंगाखेड प्रतिनिधी- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज संपूर्ण देशात मोठ्या हर्षो उल्हासात साजरा करण्यात येत आहे आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी गंगाखेड शहरातील लिटल स्टार प्रायमरी स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन हाजी मन्सूर साहब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेतील विध्यार्थ्यानी देशपर भक्ती गीत, कविता, भाषने सादर केली, सहावी वर्गातील मुलीने इंग्रजीमध्ये आपले भाषण सादर केले या कार्यक्रमास हाजी मन्सूर साहब, डॉ.कलीम सर, इंजि.नयूम साहब, तबरेज आलम,शेख सोहेल, पत्रकार सय्यद सदाम, पत्रकार महेमूद शेख तसेच विध्यार्थ्याचे पालक मोठया संख्येने उपस्तीथ होते कार्यक्रमच्या शेवटी विध्यार्थ्याना वही पुस्तकाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन सय्यद जौरी जेबा अलियोद्दीन यांनी केले तर आभार शाळेचे संचालक बेग सरांनी मानले कार्यक्रम यश्वीतेसाठी शाळेतील मुख्याधापक नुज्जत सरवरी मॅडम, शेख सायशा कौसर मॅडम, सय्यद निशात फरिदोस मॅडम, शेख फिरदोस कौसर मॅडम, गायत्री खेडकर मॅडम, शेख करिमा मॅडम, आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.