लोकनायक न्युज धरणगांव तालुका प्रतिनिधी पदी विनोद रोकडे यांची नियुक्ती

सर्व समावेशक प्रश्नांची दखल घेणे हीच खरी पत्रकारिता : ॲड.भोलाणे
धरणगाव : येथील विनोद रोकडे यांची लोकनायक न्युज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या समूहात धरणगाव तालुका प्रतिनिधी पदी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.रोकडे यांचा तालुक्यातील असणारा जनसंपर्क तसेच सामाजिक चळवळीत त्यांचा असणारा सक्रिय सहभाग लक्षात घेऊन तसेच अनुभवच्या आधारे धरणगाव तालुका प्रतिनिधी पदी जबाबदारी संपादकीय टीम ने त्यांच्यावर दिली आहे. मुख्य संपादक जितेंद्र महाजन यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा धरणगांव तालुका अधिकृत संघाच्या बैठकीत केली. या निवडीबद्दल धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी विनोद रोकडे यांचा सत्कार केला.
सत्कारप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्ही एस भोलाणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजात पत्रकाराला प्रतिष्ठित स्थान आहे. पत्रकार हा समाजात जनजागृतीचे काम करत असतो. समाजात घडणाऱ्या घडामोडी मग त्या चांगल्या असोत की वाईट, सरकारतर्फे नवीन अंमलात आलेले कायदे व योजना, समाजोपयोगी बातम्या इत्यादी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा पत्रकार करत असतो. त्याचबरोबर समाजातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सरकारपर्यंत पोहोचवून ते प्रश्न सोडवण्याचे कामदेखील एक पत्रकार करत असतो, म्हणजेच पत्रकार हा समाजकल्याणाचे काम करत असतो. लोकनायक न्युज नेटवर्क च्या माध्यमातून विनोद रोकडे यांनी सत्यता, अचूकता आणि तथ्य-आधारित माहिती, स्वातंत्र्य, वस्तुनिष्ठता, निष्पक्षता आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडाव्यात. असेही ॲड. भोलाणे म्हणालेत.
याप्रसंगी ॲड.भोलाणे यांचेसह जेष्ठ पत्रकार कडू महाजन, लोकनायक न्युज चे मार्गदर्शक राजेंद्र वाघ, सुधाकर मोरे, राजू बाविस्कर, पी डी पाटील, आर डी महाजन, विकास पाटील, सतिष शिंदे, अविनाश बाविस्कर, शैलेश भाटिया, निलेश पवार, ॲड.स्वप्निल भाटिया, धनराज पाटील, सागर पाटील, ॲड.हर्षल चौहाण, सदाशिव पाटील, मनोज महाजन, जितेंद्र महाजन, दिनेश पाटील आदींनी श्री.रोकडे यांना पुढील वाटचालीसाठी अभिनंदनसह सर्वांनी शुभेच्छा दिल्यात.