ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा.भदाणेंनी केला विवेकाचा जागर

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगाव – येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.आर.एन.भदाणे यांनी त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक कै.नीलकंठ भदाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विवेकाचा जागर करून आदरांजली वाहिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्या आप्तेष्टांच्या स्मृतिदिनानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संवेदना अर्पण करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं या भावनेतून प्रा.भदाणे यांनी विवेकनामा व अंनिस च्या अंकांचे वाटप करून आपल्या दिवंगत वडिलांना आदरांजली वाहिली. पुरोगामी विचारांनी प्रेरित असणाऱ्या भदाणे सरांनी आपल्या विचारांचा वारसा जपत विवेकाचा जागर केला. विवेकनामा तसेच अंनिस च्या अंकांचे वितरण तहसिल महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पवन देसले, शिक्षण विस्तार अधिकारी भावना भोसले, सामाजिक समरसता मंचचे प्रा.आर.एन.महाजन, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, प्रा.डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्यासह गावातील आय.टी.आय. संस्था, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पी.आर.हायस्कूल, बालकवी ठोंबरे विद्यालय, इंदिरा कन्या विद्यालय, विक्रम ग्रंथालय तसेच दहीवद माध्यमिक विद्यालय आणि आश्रमशाळा आदी शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे निरंतरपणे गावात व परिसरात बहुजन विचारधारा रुजविण्यासाठी कार्यरत असणारे सत्यशोधक विचार मंचचे हेमंत माळी सर, पी.डी.पाटील सर, आबासाहेब राजेंद्र वाघ, गोरख देशमुख, लक्ष्मणराव पाटील, निलेश पवार, विक्रम पाटील, प्रफुल पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील, अँड.कैलास मराठे, राहुल पाटील, रामभाऊ माळी आदींना अंक देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *