वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे ‘आदर्श शोचालय’ चे उद्घाटन

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी , मौजे वराड बु येथे आदर्श शोचालय चे उद्घाटन जळगांव जिल्हाचें खासदार माननीय श्रीमती.स्मिताताई वाघ व जळगांव जिल्हाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रताप भाऊ पाटील यांच्या व मा. श्री.माजी सभापती जिल्हा परिषद जळगाव पी सी आबा पाटील हस्ते उद्घाटन करण्यात आले.या वेळी धरणगाव तालुक्याचे तहसिलदार मा. श्री.सुर्यवंशी धरणगाव तालुक्याचे गट शिक्षणं अधिकारी भावना भोसले, माजी सभापती जिल्हा परिषद जळगाव पी सी आबा पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद जळगाव अनिल पाटील , माजी उपसभापती कृषी बाजार समिती धरणगाव संजय पवार तसेच गावाचे पोलीस पाटील,सर्व ग्रामपंचायत माजी व पदाधिकारी उपस्थित होत. वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली…व कसे वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव तालुक्यात व संपूर्ण भारतभर कसे व कोणत्या क्षेत्रात काम करीत आहे याची सविस्तर माहिती दिली. मुलांचे शिक्षण, मुलांचे आरोग्य, कुपोषण दूर करणे व स्थानिक पातळीवर वरील शासकिय व निम शासकिय अधिकारी सोबत मिळुन संपुर्ण तालुक्याच्या सर्वांगीण विकास कसे करित आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच जळगांव जिल्हाचे खासदार माननीय श्रीमती.स्मिताताई उदय वाघ यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव कामाची कौतुक केले व अभिनंदन करुन संपूर्ण टीम चे अभिनंदन केले. मा. श्री.प्रतापभाऊ पाटील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव कामाची वाहवा केली व उत्कृष्ठ रितीने काम करीत आहे आम्ही सुद्धा यांच्या पावलावर पाउल ठेऊन समाज कार्य करीत आहो याची पोहच पावती भाषणाने केली…तसेच गट शिक्षणं अधिकारी श्रीमती.भावना भोसले मॅडम धरणगाव यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव तालुक्यात शिक्षणा साठी चांगलें काम करीत आहे व मी स्वतः सहभागी झाले याची सविस्तर माहिती दिली…तसेच २०४० मुलांना शैक्षणिक साहित्य बॅग चे वाटप माननीय व्यासपीट यांच्या हस्ते करण्यात आले.कार्क्रमाचे सूत्र संचालन माध्यमिक विद्यालय वराड बु येथील शिरसोदे सरांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव या संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
