वाघोड येथील शेतकऱ्यांच्या मुलाने मिळवली पी एच डी पदवी…

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
रावेर तालुक्यातील वाघोड येथील शेतकऱ्यांच्या मुलगा विजय महाजन याला जिद्द व चिकाटी च्या जोरावर मुंबई येथे नुकत्याच झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी चौदाव्या दीक्षांत समारोह कार्यक्रम पी एच डी पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.
वाघोड गावातील पंडित ओंकार महाजन यांच्या मुलगा विजय पंडित महाजन यांनी वडीलांच्या कष्टाचं ची जाण ठेवत घरात फारसं शैक्षणिक वातावरण वा परिस्थिती नसतांना देखील आपलं चौथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण वाघोड जिल्हा परिषद व दहावी पर्यंत चे शिक्षण हायस्कूल मध्ये पुर्ण करत नंतर पुढील शिक्षण रावेर व फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून केमिस्ट्री विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावट नंतर एम एस सी ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे केमिकल सायन्सेस च्या गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक पटकावट शिक्षण घेतले सध्या ते मुंबई येथील यू पी एल लिमिटेड कंपनी मध्ये कारर्यरत आहे. विजय महाजन यांनी आक्टोबर 2024 मध्ये त्यांनी निकेल कॅटलिसीस कार्बोनिलिएशन रिएक्शन्स युजिंग कार्बन मोनॉक्साईड सरोगेट्स ह्या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता पी एच डी करत असतांनाच विजय महाजन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित जर्नल्स मध्ये शोध पेपर प्रकाशित केले देशातील नामांकित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथून प्रोफेसर डॉ भालचंद्र महादेव भगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले हे 2019 पासून ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यू एस ए द्वारे प्रकाशित केलेल्या विश्लेषण यानुसार जगातील शीर्ष 2% शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. आपली परिस्थिती नसतांना देखील जिद्द व चिकाटी च्या जोरावर मुलानं पी एच पदवी प्रदान झाल्याचे समाधान वडील पंडित महाजन व आई सुमनबाई महाजन यांनी आपण मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचं फळ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले ते वाघोड गावाचं रहीवासी निवृत्त मुख्याध्यापक भागवत हरी महाजन व निवृत्त मुख्याध्यापिका सरस्वती महाजन यांचे जावई होतं.