ताज्या बातम्या

वारली चित्रकला कार्यशाळा धरणगांवात उत्साहात संपन्न

धरणगाव – देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला कार्याच्या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत काळात वारली चित्रकला कार्यशाळेचे उद्घाटन मा.डॉ.निधी अमृतकर व सन्माननीय अतिथी सौ.ज्योती जाधव, सौ.कांचन बयस ,सौ.जागृती बयस, सौ. ज्योती महाजन,वारली चित्रकला प्रशिक्षक सौ. नयनाताई कापूरे यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून केले.

कार्यक्रमाची सुरुवात कल्याण आश्रमाच्या गीताने देवगीरी कल्याण आश्रम तालूका माहिला सचिव सौ.मनिषा माळी यांनी सादर करून केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालूका सह महिला प्रमुख सौ.स्वाती चौधरी यांनी केले .

वारली चित्रकला भारतीय लोकसंस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्ये आहे असे मत सौ.ज्योती जाधव यांनी आपल्या मनोगतातून करीत धरणगावात देवगीरी कल्याण आश्रमाचे कार्य अतिशय जोमाने सुरू आहे व दुर्लक्षित राहीलेल्या जनजाती पाड्यावरील मुलांच्या सर्वांगिण विकास तसेच पाड्यावरील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करीत आहात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य देवगिरी कल्याण आश्रम करीत आहे. बालसंस्कार केंद्र, आरोग्य शिबीर ,श्रध्दाजागरण अश्या वेगवेगळ्या आयामामार्फत कार्य सुरु आहे. मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून गेल्या काही वर्षापासून कल्याण आश्रम निरंतर कार्य करीत आहे अशा भावना व्यक्त केल्या. सौ.जागृती बयस यांनी या कार्यक्रमाला येऊन नविन शिकायला मिळाले मनस्वी आनंद झाला असे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रांत शिक्षा आयाम प्रमूख सौ.पल्लवी शिंगाणे यांनी वारली चित्रकलेचे महत्व सांगून कल्याण आश्रमाचा परिचय करून दिला. उत्स्फूर्तपणे युवती व महिलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.माऊंट बोर्ड , बॉटल , मडके, बाऊल, प्लेट व डबे या सर्व वस्तूंवर वारली समाजातील महिला शेतीचे , सण उत्सव, चित्रे,त्रिकोण,गोल आणि आयत या भौमितिक आकृृती,तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविणारा पुरूष मध्यभागी उभा असून त्याच्याभोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्री पुरूष अशी चित्रे, वारली जनजातीच्या देवदेवता,घर, धान्याचे कोठार,पशु,पक्षी, विविध कामे करणारे स्री पुरूष,बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित चित्रे,वारली जमातीत विवाह प्रसंग,विवाह विधी आकर्षक असे वारली चित्र रेखाटून प्रतिसाद दिला.कार्यशाळेसाठी बालकवी ठोंबरे शाळेने हाॅल उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाचे आभार सौ.मीनाताई मालपुरे यांनी केले . सौ.सुनिता सोनवणे,शालीनी बाविस्कर, सोनी बारेला ,सुकन्या माळी, भाग्यश्री माळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *