ताज्या बातम्या

विकास पाटील यांची दै.शौर्य स्वाभिमान व साई संध्या वृत्तपत्र तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती

धरणगाव : महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे धरणगाव तालुकाध्यक्ष, तथा सुराज्य न्युज चे संपादक विकास देविदास पाटील यांची दैनिक शौर्य स्वाभिमान व साई संध्या धरणगाव तालुका प्रतिनिधी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.पाटील हे सद्या सुराज्य पोर्टल न्युज चे संपादक आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना, व तालुका पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. विकास पाटील हे सातत्याने पत्रकारिता सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात लोकोपयोगी आणि समाजोपयोगी कामांमुळे त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीमुळे धरणगाव तालुका ,शहर परिसरात व पत्रकार संघातर्फे श्री.पाटील यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *