ताज्या बातम्या

विद्याभारती प्राथमिक शाळेत भव्यदिव्य असा तामिळनाडू पोंगल थीमवर आधारित हळदी कुंकू कार्यक्रम थाटामाटात संपन्न

वाशिम : माता पालक व शिक्षिका यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन- सौ. भारतीताई मिटकरी

शहरातील विद्या भारती शिक्षण संस्था संचलित विद्या भारती प्राथमिक व माध्यमिक शाळा आयोजित तामिळनाडू पोंगल-हळदी कुंकू कार्यक्रम विनायक नगर येथे थाटामाटात संपन्न झाला.शाळेमध्ये माता पालक व शिक्षिका यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला.ज्या प्रमाणे महाराष्ट्रात मकरसंक्रांत साजरी केली जाते त्याच प्रमाणे दक्षिण भारतात पोंगल सण साजरा केला जातो.तामिळनाडू पोंगल थीम नजरेसमोर ठेवून विद्या भारती शाळेमार्फत महिला पालकांकरिता हळदीकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्याभारती प्राथमिक शाळेच्या संचालिका सौ. भारतीताई मिटकरी मॅडम तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. त्रिवेणीताई मिटकरी डॉ. पल्लवी गायकवाड( कड) मॅडम, सौ. अनिताताई किरणराव सरनाईक तसेच सौ. कावेरी मिटकरी, सौ.सुनीता आवते, सौ उषाताई मिटकरी, सौ.समीक्षा आवते, सौ. त्रिवेणीताई मिटकरी, सौ. देवयानी सरनाईक, सर्व महिला पालकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग तीन दिवस पोंगल हा सण साजरा केला जातो.सूर्य, माता निसर्ग आणि भरपूर कापणीसाठी हातभार लावणाऱ्या विविध शेतातील प्राण्यांचे आभार मानण्याचा हा उत्सव आहे.या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने सारे शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील लोक सूर्याचे धन्यवाद मानतात. शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते.
यावेळी विद्याभारती प्राथमिक शाळा विनायक नगर येथे शाळेसमोरील प्रांगणात तामिळ संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी केलेली सर्व सजावट ही ज्याप्रमाणे तामिळनाडू मध्ये पोंगल सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे सर्व आयोजन करण्यात आले होते यावेळी तामिळ संस्कृतीतील प्रसिद्ध पारंपरिक वाद्य, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका , हळदीकुंकू साठी आलेल्या माता पालक व त्यांच्यासोबत आलेले चिमुकले यांचा पोशाख ही तामिळ होता. एकंदरीत वातावरण तामिळमय झाले होते. यावेळी उपस्थित महिलांसाठी तामिळनाडूमधील सुप्रसिद्ध असा अर्नव्वम् पदार्थ तयार करण्यात आला होता. सर्व महिलांनी व विद्यार्थ्यांनी आवडीने त्याचा आस्वाद घेतला.
यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले व विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले.पोंगलसाठी केलेली तयारी पाहून आपण महाराष्ट्रात असून खरोखरच तामिळनाडूत आहोत काय याचा प्रत्यक्ष अनुभव मातापालकांनी बोलून दाखविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया भेंडेकर व अवंतिका टेकाळे तर प्रास्ताविक पद्मिनी खराटे यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नितेश मिटकरी, शाळेचे संचालक सुमित सुरेशराव मिटकरी, पर्यवेक्षक विजय गोटे, , प्रियंका विभुते, माधुरी मिटकरी ,प्रतिभा पराते, संगीता डहाळे, धनंजय आंबटवार, मयूर वाडेकर, पवन निमके, कांचन कापसे, कीर्ती कुलकर्णी, महेश लावरवार, भारती अनिल भिसडे, ज्योती शिरसाट, अमोल इंगळे, श्रीकृष्ण गोरे, अर्जुन मुंढे, सुमित्रा ठाकरे, निकिता हिरवे, रूपाली अवगण योगिता आरे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *