विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी हजारोंचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला..
बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर शहरातील पाणी प्रश्न,अन्यायकारक नळपट्टी वसूली आणी कबालनामे मंजूरी आणी घरकूल मंजूरी या बरोबरच विविध विकास प्रश्न आणी नागरी समस्या अशा जवळपास चाळीस प्रश्नावर येथील सम्राट मित्रमंडळ-लातूर अहमदपूर च्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर हजारांचा मोर्चा धडकला.येथील नगर परिषद मैदान येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला.या वेळेस माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, दयानंदराव वाघमारे, डाॅ.बालाजी थिट्टे,संतोष वाघमारे,शेखूभाई शेख,शेख हाशमभाई,शेख रहीमभाई, शेख नूर मोहम्मद, मोहम्मद पठाण,शेख हाकीमभाई, शेख अजगरभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांची भाषणे संपन्न झाली.प्रामुख्याने शहरातील पाणी प्रश्न,घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, अन्यायकारक बेकायदेशीर नळ थकबाकी, उपजिल्हारूग्णालय मंजूरी,पिक विमा मंजूरी,रमाई घरकूल प्रधानमंत्री आवास योजना अनुदान वाढविणे, मयत कामगार गायकवाड यांच्या परिवारास अर्थसहाय्य,बेघराना घरकूल मंजूरी अशा 37 महत्त्वाच्या विषयावर मोर्चा काढून तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांच्या कडे निवेदन देण्यात आले.लवकरच निवेदनातील प्रमुख मुद्यावर तालूकास्तरावर बैठक घेवून विषय मार्गी लावण्याचे अश्वासन दिले.या प्रसंगी रितेश रायभोळे, हाशम भाई, दिनेश तिगोटे, राज मतकर, पठाण मोहम्मद, शेख नूरमोहम्मद, सय्यद नोशाद,आकाश पवार,संगमेश्वर बनसोडे, संविधान कदम, प्रकाश लांडगे,तबरेज सय्यद, आयुब शेख, शरद बनसोडे, शरद सोनकांबळे, अजय भालेराव, ईश्वर कांबळे, पठाण शाहरुख, शेख इमरान,शेख अलीम शेख जहांगीर, शेख इब्राहिम, शेख बाबा, शेख अजगर, शेख हाजी पठाण फहारुख, पाठन उमर, गायकवाड युवराज आदींनी पुढाकार घेतला.