शिक्षक दिनी शुभेच्छा देऊन केला शिक्षकांचा कार्य गौरव

वाशिम – दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या अनुषंगाने मेडशी मतदार संघाचे माजी आमदार विजयरावजी जाधव साहेब यांच्यातर्फे रिसोड शहरातील जिल्हा परिषद व विविध नामांकित संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये भेटवस्तू स्वरूपात घडयाळ आणि शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक दिनाच्या अनुषंगाने शुभेच्छा पत्राचे माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या या शाळा कॉलेजेस मध्ये प्रामुख्याने….श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
श्री शिवाजी प्राथमिक शाळा,
श्री शिवाजी उर्दू प्राथमिक शाळा,
लायसीएम स्कूल, राजर्षी शाहू विद्यालय निजामपूर,
रहेमानिया माध्यमिक उर्दू शाळा, रहेमानिया प्राथमिक उर्दू शाळा,
अल्लामा इकबाल माध्यमिक शाळा,
अल्लामा इकबाल प्राथमिक शाळा,
बाबासाहेब धाबेकर इंग्लिश स्कूल,
पोद्दार इंग्लिश स्कूल ,
निवासी अपंग विद्यालय,
राजस्थान कॉन्व्हेंट,
जिल्हा परिषद शाळा निजामपूर,
श्री सिद्धेश्वर विद्यालय रिसोड,
जय लखमा पॅरामेडिकल कॉलेज, इत्यादी शाळांचा महाविद्यालयांचा समावेश होता ह्या उचित समयी आदरणीय विजयरावजी जाधव साहेबांचे खंदे समर्थक जयंत वसमतकर सर, ज्ञानेशप्रसाद, संस्थापक, आम्ही तेली जय संताजी फाउंडेशन ज्ञानेशप्रसाद तद्वतच दुर्गाताई कढणे, अर्चनाताई बोलवार, राधाताई साबळे आदींसह साहेबां वर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सर्वच शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व आम्हा शिक्षकांची या उपक्रमाच्या माध्यमातून आठवण केली नोंद घेतली त्याबद्दल समाधान व्यक्त केले आम्हा शिक्षक वर्गांचे नोंद घेतल्याबद्दल आम्ही आपल्या माध्यमातून साहेबां चे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो अशा प्रतिक्रिया जवळजवळ सर्व शाळांच्या प्राध्यापकांनी व्यक्त केल्या.