शिवसेनेच्या उपनेते पदी शुभांगी ताई पाटील यांची निवड
प्रतिनिधि – आमीन पिंजारी
कजगाव तालुका भडगाव येथून जवळच असलेल्या पाचोरा तालुक्यातील सर्वे येथील माहेर असलेले शुभांगी ताई पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड ,शिवसेना राज्य कार्यकारिणीचा काल दि.१५/१०/२०२३ रोजी विस्तार करण्यात आला असून या विस्तारात नाशिक विभागातुन शिवसेनेच्या धडाडीच्या महिला नेत्या व उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख शुभांगी ताई पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांना उपनेते पदी पदोन्नती देण्यात आली आहे. शिवसेनेत उपनेते पद हे मोठे व जबाबदारीचे पद असुन शुभांगी ताई पाटील यांच्या मागील कार्याचा लेखाजोखा पाहता शुभांगी ताई पाटील यांनी गेल्या वर्षीच नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून ज्या प्रकारे निवडणूक लढवली व दुसऱ्या स्थानी राहिल्या. तसेच त्यानंतरही त्यांचा पक्षातील कामाचा धडाका , जिद्द , चिकाटी व मेहनत पाहता त्यांना सदर पदावर नियुक्त करण्यात आले आहे.शुभांगी ताई पाटील या शिक्षक नेत्या असून त्यांच्या मागे शिक्षकांचे मोठे पाठबळ आहे त्याचप्रमाणे शिक्षकांव्यतिरिक्त देखील समाजकारणातून त्यांच्या मागे सामान्य जनतेचा व तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. या नियुक्ती बाबत शिवसेनेचे मुखपृष्ठ दैनिक सामना मधून पदाची घोषणा करण्यात आली असून शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत यांनी मोबाईल फोनवरून शुभांगी ताईंना याबाबत कळविले. उत्तर महाराष्ट्रात अशाप्रकारे एका महिला पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच उपनेतेपद देण्यात आले असून त्यामुळे धुळे ,जळगाव, नंदुरबार ,नाशिक व अहमद नगर या जिल्ह्यांमधून सदर नियुक्ती बद्दल आनंद व समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज दिनांक 16 रोजी धुळे येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या निवडीबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी या निवडीबद्दल धुळे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री अशोक धात्रक यांनी फोनवरून तर धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे रावसाहेब, महानगर प्रमुख धीरज पाटील ,माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर ,यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभांगी ताई पाटील यांचे अभिनंदन केले.