ताज्या बातम्या

शेडोळ येथे गुढीपाडवा व बालेपर दर्गाह याञा मोठ्या उत्साहात संपन्न

लातूर : निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी शेडोळचे ग्रामदैवत बालेपीर दर्गाह येथे शेकडो भाविकांनी दर्शन घेत कुस्तीचा आनंद घेतला,शेडोळचे सुपुञ सुरेश ईगवे पाटील व सुधाकर कुंभार यांच्या सुसज्य संकल्पनेतुन शेडोळ याञेत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .लावणी महोत्सव व मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ,सुधाकर कुंभार व सुरेश ईगवे पाटील यांनी लावणी महोत्सवाचे आयोजन केल्याने गावातील ग्रामस्थांनी लावणी महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद देत लावण्याचा आनंद घेतला ,सुरेश ईगवे पाटील व सुधाकर कुंभार यांच्या तर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ,जे मल्ल व भाविक कुस्ती खेळण्यासाठी व कुस्ती पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ,यावेळी सुरेश ईगवे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले की असाच लावणी महोत्सव व सांस्क्रतीक कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही शेडोळ च्या ग्रामस्थासाठी आयोजीत करणार असल्याच यावेळी सुरेश ईगवे पाटील यांनी सांगीतले .काल शेडोळ येथे याञेनिमीत्त पारंपारीक पद्धतीने राजभरातील सुप्रसिद्ध मल्लांनी कुस्तीचा फड गाजवला .यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव धुमाळ .मा.जिल्हा परीषद अध्यक्ष पंडीतराव धुमाळ .सरपंच स्वरुप धुमाळ ,उपसरपंच विशाल धुमाळ ,सतिश गुरुजी धुमाळ ,श्रीधर धुमाळ समाजसेवक माणीक धुमाळ ,सचिन धुमाळ ,सुरेश ईगवे पाटील ,सुधाकर कुंभार सह शेडोळ ग्रामस्थांच्या अथक परीश्रमाने कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *