शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी यांची साईबाबा जन्मस्थान मंदिराला भेट !

‘ हंडी बाबा ‘मूर्ती मॉडेल चे उद्घाटन
पाथरी वार्ताहर / उध्दव इंगळे
पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पिताश्री श्रीनिवासजी लाहोटी, मातोश्री लीनाजी श्रीनिवास लाहोटी , सुकन्या गिरीजा, यांचे समवेत परमपूज्य साईबाबांचे श्रद्धापूर्वक भक्ती भावाने दर्शन घेतले. श्रीसाई स्मारक समिती ट्रस्ट, पाथरी च्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, त्यांचे आदरपूर्वक यथायोग्य स्वागत करून त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. मंदिर अधिक्षिका सौ छाया कुलकर्णी, सौ लीना लाहोटी, लक्ष्मी नागठाणे वगैरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे औक्षण केले व त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.
परमपूज्य साईबाबा शिर्डी येथे द्वारकामाईत स्वतः तांदळाची खिचडी करीत असत त्या डेगीत /हंडीत उकळत्या पाण्यात शिजणाऱी खिचडी कौच्याने न हलवता साईबाबा स्वतः हात घालून खिचडी करीत असत व भक्तांना प्रसाद म्हणून वाटत असत.
या प्रसंगाची ‘ हंडी बाबा ‘ मूर्तीचे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे. त्या मॉडेल चे उद्घाटन याप्रसंगी आदरणीय शैलेशजी लाहोटी, उपविभागीय अधिकारी पाथरी यांचे शुभ हस्ते करण्यात आले.