ताज्या बातम्या
श्रीगुरुदेव सेवाश्रम नांदुरा येथे राष्ट्रधर्म प्रचार समिती द्वारा आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर येथे खा.रक्षाताई खडसे यांची भेट…
प्रतिनिधी – उमेश कोळी
जळगांव – नांदुरा येथील श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे राष्ट्रधर्म प्रचार समिती द्वारा श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर” चे आयोजन करण्यात आले असून, आज सदर शिबिराच्या समारोपास खा. रक्षाताई खडसे यांनी मा. आ. श्री.चैनसुख संचेती यांच्यासह उपस्थित राहून मार्गदर्शन केले.यावेळी खा. रक्षाताई खडसे व माजी आमदार श्री.चैनसुख संचेती यांच्यासह, आचार्य श्री.हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार पालवे, डॉ.योगेश शेवाळे, डॉ.नरेंद्र तराळ, श्री.चोरे साहेब, शिबिर प्रमुख श्री.मनोज चोपे, श्रीमती आरती पालवे, श्रीमती अश्विनी शेवाळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोष मुंडे, शहराध्यक्ष श्री.श्याम राखुंडे, श्री.गणेश भोपळे, श्री.उमेश तकावले ई.उपस्थित होते.