श्री संत ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत विनामूल्य प्रवेश देणे सुरू
धरणगाव : येथील श्री संत ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेत दि १ जून २०२४ पर्यंत विनामूल्य प्रवेश देणे सुरू आहे. अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी इ. ५ वी ते १० पर्यंतचे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्याच्या मनावर चांगले संस्कार घडावेत तसेच विद्यार्थी हा गुणवंत सुसंस्कृत घडावा. उज्वल देशाचा आदर्श नागरिक घडावा या हेतूने श्री. संत ज्ञानाई वारकरी संस्थेचा प्रयत्न असतो. हरीपाठ, श्रीमद् भगवद्गीता संत अभंग, गौळणी व गायन वादन आदींसह शिक्षण दिले जाईल. शिक्षण देणारे मार्गदर्शक हभप अनिल महाराज, हभप विश्वनाथ महाराज, हभप चंद्रकांत महाराज, हभप विठोबा महाराज, हभप राजेंद्र महाराज, हभप संजय महाराज हे बालाजी नगर येथे वर्ग घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी वारकरी संस्थेत प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष हभप हिरालालजी महाराज ९८२३४५६१०८ धरणगावकर यांनी केले आहे.