ताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतिमंद विद्यालय व श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय अहमदपूर येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी

अहमदपूर : तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतिमंद विद्यालय व श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय अहमदपूर येथे प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री शिवाजीराव पालेपाड साहेब तहसीलदार अहमदपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री विकास तपशाळे साहेब तसेच शेकडे साहेब व केंद्र प्रमुख मठपती सर मा श्री मोघे सर उपस्थित होते आज शाळेतील प्रवेशोत्सव निम्मित शाळेत विद्यार्थ्यांचे मा तहसीलदार साहेब यांच्या हस्ते गुलाबाचे फुल देवून शाळेत स्वागत करण्यात आले ,त्याच बरोबर शाळेतील पहिल्या दिवशी शाळेत 100 टक्के उपस्थिती पाहून साहेबांनी सर्वांचे कौतुक केले तसेच मान्यवरांचे स्वगात करण्यात आले नवीन पालक व विद्यार्थी यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल व हार घालून शाळेत स्वगात करण्यात आले.मान्यवरांनी दिव्यांग मुलांना विशेष शाळेतच का पाठवावे दिव्यांग मुलांना विशेष शाळेची आवश्यकता काय या विषयी मार्गदर्शन केले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेकार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *