जळगांव जिल्हा

श्री संत सावतामाळी युवक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी दिनेश महाजन तर विभागीय संघटक पदी विनायक महाजन यांची पदोन्नती

जळगाव – अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य,या सामाजिक संघटनेच्या वतीने धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश महाजन यांची तालुका अध्यक्ष पदी व विनायक महाजन विभागीय संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.

श्री विनायक महाजन

जळगाव येथील माळी भवन खोटेनगर,येथे संघटनेच्या जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता,त्या प्रसंगी अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भाऊ गुलदगड व प्रदेश अध्यक्ष श्री जितेन्द्र भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार विभागीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *