संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि सौ.अल्का चुडिवाल यांचा सत्कार समारंभ आर्वी येथे संपन्न
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जनजागर या संकल्पनेंतर्गत संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आणि सत्कार समारंभाचे आयोजन त्रिशरण बुद्ध विहार व भीमसैनिक अशोकराव कुंभारे परिसर,आर्वी येथे संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव सोमकुवर (सामाजिक कार्यकर्ते) तर उद्घाटक दिलीपजी पखाले (शासकीय विद्युत कंत्राटदार) , स्वागतध्यक्ष कमलेश कामळी , दीप प्रज्वलनकर्ते मा.राहूपाल नाखले मा. राजू हेंडवे,मा.प्रशांत मात्रे तसेच विशेष निमंत्रित मा. देवराव खंडेराव (पोलीस उपअधीक्षक आर्वी) मा.यशवंत सोलसे, मा डॉ.राजपाल भगत मा. गायत्री सोनवणे (वनपरिक्षेत्र अधिकारी आर्वी), मार्गदर्शक मा मधुकर्जी सावळे, गजानन गायकवाड.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भंते धम्मरत्न टाकरखेडा, मा.प्रा. डॉ.अनिल दहाट मा.प्रा. पंकज वाघमारे मा.प्रा.डॉ.प्रवीण काळे, मा.प्रफुल कांबळे, मा. प्रा.डॉ.विजया मुळे मॅडम, मा श्री अर्पित वाहाणे चतुर साहेब, मा ओमप्रकाश मनवर पाटीलमा प्रवीण तंबाके, मा.मधुकर सोमकुवर, मा. नरेंद्र पखाले. यावेळी संगीतमय प्रबोधनात्मक सादरकर्ते आयु.स्वप्नील मेश्राम (फुले शाहू आंबेडकर चळवळीचे राष्ट्रीय प्रबोधनकार नागपूर) व संघ मंचावर उपस्थित होते. संविधानाचा जागर व्हावा हा उद्देश समोर ठेवून आदर्श एकता सामाजिक संघटना गेल्या दहा वर्षापासून संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम आणि सोबतच मानवी मूल्य जपणाऱ्या व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आर्वी, आष्टी,कारंजा तालुक्यातील महानुभवांचा सत्कार घेत असते, यावेळी आर्वी शहरातील भटक्या जनावरांना स्वखर्चाने भोजन देणाऱ्या मा.अलका चुडीवाल यांचा व महिला सक्षमीकरणासाठी तसेच धम्मकार्यासाठी आर्वी शहरात अग्रेसर असणाऱ्या प्रा. डॉ.विजयामुळे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच काका अकॅडमीतील हॉलीबॉल आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडू संघाला गणवेशांचा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले. स्वप्निल मेश्राम यांनी प्रबोधन करत असताना महापुरुषांचे विचार जनमानसात रुजावे आणि त्यांनी ते कृतीत उतरवावे त्याचप्रमाणे संविधानाचा उदो उदो न करता संविधान वाचून ते कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी आपल्या गायनातून मांडले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अमर काशिनाथ भोगे व आभार विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्योधन गोंडाने चंदा सरोदे मंगेश सरोदे, निर्मला कुंभारे,शुभांगी कुंभारे,मोहन मसराम, राकेश वरठी, प्रमोद चोरपगार, अनिल तायडे, सुजित देवगडे, मा अर्पित वाहाणे आकाश मून, विजय गजभिये, महेंद्र घोडे, प्रमोद घोडिले, वंदना बडगे, प्रदीप बनसोड, विनोद वासनिक, दिनेश शिंगणापूर, नितेश पाटील विजय कुंभारे, सुलोचना कुंभारे, दुर्गा कांबळे राजू डोंगरे चंदा डोंगरे यांनी यशस्वी प्रयत्न केले.