संविधान मुळेच लोकशाही टिकून : सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीने दिनांक २३जानेवारी २०२५रोजी झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपन्न झाली यांत महाराष्ट्र मध्ये संविधान चे महत्व जनतेपर्यंत जावे म्हणून प्रत्येक तालुक्यातील गावोगावी संविधान चेभारत मातेच्या पूजन आदेश देण्यात आले होते म्हणून धरणगाव शिवसेना तर्फे साने पटांगण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री वाघ यांनी मत व्यक्त केले २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.तसेच त्याची प्रत संविधान चे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. असे मत श्री वाघ यांनी व्यक्त केले यावेळी मा लोकनियुक्त नगराध्यक्ष युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे., म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे, असे प्रतिपादन निलेश चौधरी यांनी व्यक्त केले यांची होती उपस्थितिथीशिवसेना उपजिल्हासघटक राजेंद्र ठाकरे, तालुका प्रमुख जयदीप पाटील शहर प्रमुख भागवत चौधरी युवासेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन,बापू महाजन संतोष सोनवणे शरद पाटील सुभाष महाजन, सतीश बोरसे सुनील चव्हाण प्रल्हाद पारधी, फिरोज पटेल , दिनेश येवले पप्पू सोनार , रणजित सिकरवार, राहुल रोकडे गजानन महाजन गोपाल पाटील, प्रेमराज चौधरी,उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले.