ताज्या बातम्या
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी संदीप कदमअर्धापूर: तालुक्यातील डौर येथील शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाला कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१६ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. पंडीतराव किशनराव साबळे (वय-६०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील डौर येथील शेतकरी पंडीतराव किशनराव साबळे (वय-६०) यांच्याकडे तीन एकर जमीन असून अल्पभूधारक शेतकरी होते. गेल्या काही महिन्यात सतत नापिकीचे संकट सुरू होते. त्यातच बँकेचे कर्ज होते. या विवंचनेत दि.१६ मार्च रोजी डौर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.