सनपुले येथिल ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर

चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
चोपडा – “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या मागणीप्रमाणेच परिस्थिती नसतांना, जास्त पैसा गाठीशी नसला तरी, फक्त चिकाटी व जिद्द सोबत असली तरी शून्यातून देखील एक सुंदर विश्व निर्माण करता येऊ शकते, त्याचेच जणू काही मूर्तिमंत धडा गिरवलाय. त्याचेच एक आदर्श असे उदाहरण म्हणुन, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सनपुले ह्या एका खेडेगावातील शेतकऱ्याचा हा मुलगा, एमबीबीएस डॉक्टर बनलाय. तो मुलगा म्हणजे चि.डॉ.गौरव मीनाबाई संजय गुर्जर असे या डॉक्टर मुलाचे नाव असून, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किरण गुर्जर यांचे ते पुतणे आहेत संजय मच्छिंद्र गुर्जर हे त्या शेतीकाम करणारे शेतकरी वडिलांचे नाव आहे. नुकताच सनपुले येथील एका कार्यक्रमा दरम्यान चि.डॉ.गौरवचा सत्कार हा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी तथा महात्मा गांधी विद्यालयाचे अध्यक्ष-ऍड.संदीप भैया पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचप्रमाणे नुकताच.. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री-नामदार मा.गुलाबभाऊ पाटील यांचे स्वीयसहाय्यक-नवलसिंग राजे यांचे हस्ते सनपुले येथे घरी येऊन चि.डॉ.गौरवचा शाल-श्रीफळ,पुष्पगुच्छ तथा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. चि. डॉ.गौरवचे आजोबा,आई-वडील,काका-काकु, हे सनपुले ता.चोपडा येथिल, एक आदर्श शेतकरी असून, चि.डॉ. गौरव मीनाबाई संजय गुर्जर याने वैद्यकीय क्षेत्रात मुंबई येथे सायन मेडिकल कॉलेज येथे एम.बी.बी.एस.परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन, नेत्रदीपक असे यश संपादीत केले. सनपुले येथे पारंपारिक शेती या व्यवसायात शेती करून आपल्या मुलाने उच्चशिक्षित व्हावे, असा पहिल्यापासून या कुटुंबातील सर्व सदस्यांची मनापासून इच्छा होती, आणि त्या हाकेला हाक देत चि. डॉ.गौरवने देखील साथ देत आई-वडिलांचे व सर्व कुटुंबाचे स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणजे, चि. डॉ.गौरव मिनाबाई संजय गुर्जर याने नुकताच एमबीबीएस अंतिम वर्षाचा निकाल घोषित झाला व त्यात डॉ. गौरव मीनाबाई संजय गुर्जर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण देखील झाला. त्याच फ्री शिप मध्ये मुंबईच्या “सायन हॉस्पिटल” येथील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांची मेहनत हि सार्थकी ठरली !
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव चि. डॉ.गौरव यांना होती, शेती करणाऱ्या भोळ्याभाबड्या आईवडिलांच्या कष्टाचे प्रत्यक्षात सार्थक व्हावे म्हणून गौरव नेहमीच अभ्यासामध्ये मग्न राहिला. चि.डॉ.गौरवने प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की,
“माझ्या या यशापर्यंत पोहचण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी व काका काकुचा चा पण खूप मोठा मोलाचा हातभार आहे. मला त्यांनी डॉक्टर बनवले, याचा खूप अभिमान आहे. मी आज जो काही आहे, ते माझे काका किरण मच्छीन्द्र गुर्जर, जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा देवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि सोबतच माझी आजी-आजोबा व आई-वडिलांच्या आशीर्वादाने, तसेच त्यांच्या कष्टाचे हे फळ आहे असे डॉ. गौरव यांनी सांगितले.
माझ्या मुलाला गरिबीची जाण असल्याने त्याने आम्हाला कधीही जास्तीचा आर्थिक त्रास दिला नाही, जो खर्च येईल तो आम्ही काळजीने भागवत त्याला शिक्षणासाठी पैसा दिला. त्याने सर्व गोष्टींची जाण असल्यामुळेच हे यश प्राप्त केल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे चि.डॉ.गौरव चे वडील संजय मच्छिंद्र गुर्जर यांनी सांगितले.
सनपुले गावातच त्याने प्राथमिक शिक्षण घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देखील घेतले. सनपुले ता.चोपडा जिं जळगाव येथील कालभैरव माध्यमिक विद्यालय सनपुले येथे इयत्ता १० वीत विद्यालयात पहिला आला, आणि पुढे त्याला फ्री शिप मध्ये एम.बी.बी.एस.साठी प्रवेश मिळाला. त्यांनी ही परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये पास करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करून, चि. डॉ.गौरवने आपल्या आई-वडिलांचे व संपूर्ण घराण्याचे स्वप्न तर साकार केलेच सोबत नाव लौकिक देखील केले.