ताज्या बातम्या
सनपूले आश्रमशाळेतील खेळाडूचे यश ; १००मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम
चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन २ ऑक्टोबर रोजी कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा येथे करण्यात आले होते.यादरम्यान १७ वर्षे वयोगटातील १०० मिटर धावण्याच्या शर्यतीत अनुदानित आश्रमशाळा सनपुले येथील खेळाडू सयाराम मन्साराम बारेला याने प्रथम क्रमांक पटकाविला.प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.त्याच्या या यशाबद्दल प्रकल्प अधिकारी अरुण पवार,अध्यक्ष पी.जे.पाटील,सचिव गणेश पाटील,मुख्याध्यापक नितीन पाटील,मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले आहे.यावेळी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर.सुलताने,क्रीडा शिक्षक ए.व्ही.कचरे,भूपेश पाटील,भूषण पाटील यांची उपस्थिती होती.