ताज्या बातम्या

समाजाचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील…ना गुलाबराव पाटील

, माळी समाजाचे भुमीपुजना प्रसंगी ना पाटील यांचे आवाहन धरणगावा त भा वृतसेवा सामाजिक व विधायक काम करतांना समाजाचे काही देणं लागतं त्या अनुषंगाने मी देखील समाजाचा विधायक कार्यासाठी प्रयत्नशिल असुन इतर समाजबांधवानी देखील सहभागी होऊन आर्थिक सहकार्यची आवाहन केले नुकत्याच येथील येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा येथे आज सकाळी 11वाजता भुमीपुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला त्या प्रसंगी ना पाटील बोलत होते लहान माळी वाडा परिसरातील नवेगांव येथील सहा हजार तिनशे क्रेअरफुट जागेवर समाजाची नविन वास्तुचे भुमीपुजन जिल्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, समरसता मंच प्रा आर एन महाजन सर,गुलाबराव वाघ,उमविचे सिनेट सदस्य दिलीपदादा पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, राष्टवादी चे नेते ज्ञानेश्वर महाजन,राजपुत समाजाचे अध्यक्ष जिवनआप्पा बयस,नगरसेवक कैलास माळी सर, पप्पु भावे,ललीत येवले,भालचंद्र महाजन,वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, बुट्या महाजन,काॅन्टेक्टर, मोहन महाजन चर्मकार महासंघाचे अध्यक्ष भानुदास आप्पा विसावे, ज्ञानेश्वरी कंन्ट्रक्षणचे भगवान महाजन, माजी नगराध्यक्ष सौ पुष्पाताई महाजन,सौ उषाताई वाघ,माजी नगराध्यक्ष अंजली ताई विसावे, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय चे नितादिदी, धनपाचे मुख्याधिकारी जनार्धन पवार, मोठा माळी वाडा समाज पंच मंडळ चे अध्यक्ष विठोबा महाजन,माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा चे अध्यक्ष रामकृष्ण महाजन,पाटील समाज पंच मंडळ चे अध्यक्ष भिमराज पाटील, तिळवण तेली समाज चे अध्यक्ष सुनिल चौधरी, सह विविध मान्यवर चा उपस्थित भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रारंभी दिप प्रज्वलन व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले संत सांवता महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे प्रतिमेचे पुजन करण्यात करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले त्या प्रसंगी समाजाचा वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला प्रारंभी प्रास्ताविकात जेष्ठ पत्रकार व सामाजाचे पंच कडू महाजन यांनी समाजाचे माजी अध्यक्ष किसन महाजन, बाबुराव महाजन, पुंडलिक नथु महाजन यांचा संकल्पनेतुनच नविन वास्तुचे भुमीपुजन होत असल्याची जाणीव करून देत त्यांचे स्वप्न साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करून देत असल्याचे नमुद केले तसेच तीन कोटी रूपये इस्टेमेट असलेल्या ह्या वास्तुबांधकामा साठी समाज बांधवांना आर्थिक मदतीचे आवाहन करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडलीकार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा मनोगतातुन सामाजिक कार्यात समाजाचे मोठे देणं लागतं या भावनेतून सर्व परी मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले तर आभार राजेद्र मागो महाजन यांनी मानले यशस्वी साठी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, विलास महाजन, खजिनदार राजु महाजन, पुंडलिक महाजन, दिपक महाजन, सुधाकर महाजन, गुलाब महाजन सह समाज बांधवांनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *