सामाजिक कार्यकर्ते शुभम सोनवणे यांनी अजितदादांना जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या व आदिवासी कोळी समाजाच्या समस्यांबाबत केले निवेदन सादर
प्रतिनिधी विनायक पाटील
अमळनेर – आज राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार हे जनसन्मान दौरा प्रसंगी अमळनेर येथे उपस्थित असताना आदिवासी अनु. कोळी जमातीचे सामाजिक कार्यकर्ते कुमार शुभम समाधान सोनवणे यांनी अजितदादांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे चोपडा शहराचे अध्यक्ष या नात्याने राज्यातील आदिवासी कोळी जमातीच्या समस्या सोडविण्यासंदर्भात व जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या थकीत केळी पीक रक्कमेच्या वाटपाची लवकर कार्यवाही होणेबाबत निवेदन सादर केले. सदर कार्यक्रम प्रसंगी समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील, महिला आयोग अध्यक्ष सौ.रुपालीताई चाकणकर, आ. अमोल मिटकरी, माजी जि. प.सदस्य सौ.जयश्रीताई पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हयातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.