सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी गठीत
धरणगाव येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात नुकतीच दोघ विभागाच्या सन्माननीय मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी नियुक्तीची बैठक संपन्न झाली.यात माध्यमिक विभागात अध्यक्ष म्हणून एस. एस. पाटील ,उपाध्यक्ष-पालक म्हणून आनंदा पंडित धनगर,सचिव-ए. डी. पाटील,सहसचिव-ए .एच. पाटील व सौ.माधुरी विजय पाटील यांची तर प्राथमिक विभागात अध्यक्ष म्हणून जीवन पाटील,उपाध्याय म्हणून पालक सौ.मनीषा दत्तात्रय पानपाटिल,सचिव-महेश आहेराव,सहसचिव-वाय. पी.पाटील व समाधान सदाशिव मोरे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी गुलाबपुष्प देऊन निवड झालेल्या पदाधिकारी यांचे दोघ मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षक किशोर चौधरी व डी.आर.चव्हाण यांनी अभिनंदन केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीवर चर्चा करण्यात आली.सभेचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाचे पालक शिक्षक संघाचे प्रमुख महेश आहेराव, माध्यमिक विभागाचे पालक शिक्षक संघाचे प्रमुख ए. डी.पाटील यांनी केले .आभार ए. एच.पाटील यांनी मानले.यावेळी प्रत्येक वर्गाचे पालक प्रतिनिधी व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.