ताज्या बातम्या
सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

काकासाहेब दामोदर कुडे बालक मंदिर, बालकवी ठोंबरे प्राथमिक विद्यालय आणि सा. दा. कूडे माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री.आर.एन.महाजन सर, श्री एस.एस.पाटील सर ,श्री जीवन पाटील सर,आर.एम.चौधरी, वर्षा पाटील ,सांस्कृतिक समिती प्रमुख कैलास माळी आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते . याप्रसंगी सकाळ सत्रात श्री एस एस देसले सर तर दुपार सत्रात श्रीमती आर.पी.पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली.सूत्रसंचालन वाय पी पाटील व आभार पी एन पाटील व दुपार सत्रात सरोज तारे यांनी मानले.
