ताज्या बातम्या

साळवे हायस्कूलचा शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के निकाल…

धरणगाव : तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालय, साळवे ता.धरणगाव येथील ऐंशी विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत शंभर टक्के यश मिळवून शाळेत शिरात सन्मानाचा तुरा रोवला.तीन विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली तर सहा विद्यार्थी ब श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.एक्कात्तर विद्यार्थ्यांना क श्रेणी मिळाली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री एस पी तायडे यांनी मोफत मार्गदर्शन केले,सराव करून घेतला व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन सूचना दिल्या त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. त्याबद्दल कलाशिक्षक एस पी तायडे, अश्रेणी प्राप्त करणारे विद्यार्थी- गायत्री बोरोले, साक्षी नारखेडे आणि ज्ञानेश्वर मोरे यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ व टाँवेल देऊन मुख्याध्यापक ए एस पाटील ह्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन व प्रास्ताविक एस डी मोरे यांनी केले, यावेळी जी व्ही नारखेडे, ए वाय शिंगाणे, व्ही के मोरे बी आर बोरोले, सौ एन बी पाटील, सौ गुणवंती पाटील, सौ प्रतिभा पाटील व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन व कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *