सुखदेव सिंह गोगामेडी यांना धरणगाव राजपुत समाजाच्या वतीने श्रद्धांजली
जळगांव – धरणगाव_सुखदेव सिंह गोगामेडी हे अखिल भारतीय राजपूत समाजसाठी काम करणारे आणि हिंदुत्वाची प्रखर धगधगती ज्योत होते. त्यांच्या हत्येने सुखदेव सिंह जी यांचे विचार आणि कार्य थांबणार नाही त्यांचे विचारावर कार्य करण्यासाठी करणी सेना कटिबध्द आहे.अशा भावना राजपूत समाजाचे सचिव गणेशसिन्ह सुर्यवंशी यांनी व्यक्त केल्या धरणगाव येथील महाराणा प्रतापसिंह चौफुली वर आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते जयपूर येथे भर दिवसा घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी राष्ट्रीय राजपूत करणे सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या केली या घटनेच्या निषेध आणि स्वर्गीय गोगामेडी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करणी सेना , राजपूत समाजामार्फत आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्री सूर्यवंशी म्हणाले की सुखदेव सिंह जी एक योद्धा होते, एक विचार होते. योद्धा आणि विचार कधी मरत नसतात त्यांच्या स्मृती सातत्याने समाजाला प्रेरणा देत असतात. करणी सेनेच्या माध्यमातून सुखदेवसिंह जी यांनी अनेक असे योधे तयार करून ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांचे विचार आणि त कार्य सातत्याने सुरू राहील. समाजासाठी लढणाऱ्या योद्धाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून निर्घृणपने समाजकंटकांनी हत्या केली आहे त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून फाशी द्यावी अशी मागणी सकल धरणगाव तालुका राजपूत समाज बांधवांसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी राजपूत समाजाचे अध्यक्ष जीवनसिंह बंयास शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, सहकार भारतीचे प्रा. डी आर पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी के पाटील, करणी सेनेचे प्रथम सिंह सूर्यवंशी,राष्ट्रीय चर्मकार समाजाचे भानुदास विसावे , धिरेंद्र पुरभे, कडूसिंग बायस,डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, डी एस पाटील,प्रा एस पी पाटील, कल्याणी खुर्द वि.का. सोसायटीचे चेअरमन सोपान पाटील, नामदेव मराठे,लक्ष्मण पाटील,अड शरद माळी, गोपाल सिंह बायस , निशांत बायस ,प्रकाश सिंह बायस ,प्रल्हाद सिंह चौहान, राजन सिंह बायस ,शाम सिंह चौहान, गौरव बायस, पवन परदेशी ,हिमालय सिंह सिकरवार, महेंद्र सिंह चौहान ,राजेंद्र सिंह सूर्यवंशी, विजय सिंह सूर्यवंशी ,डॉ शैलेश सिंह सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सिंह जनकवार ,ब्रजेश चौहान,यांच्यासह कल्याणी होळ कल्याणी खुर्द, हींगोने, लोणे, जुनोने आदी गावाहून, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.