सेवानिवृत्त न पा लिपिक संजय शुक्ल यांचा सपत्निक सत्कार ; समाज बांधव,नगरपालिका अधिकारी, व राजकीय पदाधिकारी उपस्थित
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव : येथील नगरपालिका मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक संजय वसंत शुक्ल याची प्रदीर्घ 35 वर्षी पासून नगरपालिका मधील कार्यकाळा पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झाले त्याचा छोटेखानी सत्कार न पा प्रशासन कडून करण्यात आला यावेळी न पा चे मुख्याधिकारी श्री झंवर यांनी शाल श्रीफळ व सेवानिवृत्त धनादेश देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पालिका चे मा गटनेते पप्पू भावे, ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष किशोर भावे, जेष्ठ विधीतज्ञ ऍड हरिहर पाटील, मा नगरसेवक भागवत चौधरी, किरण मराठे , जितेंद्र धनगर, पत्रकार संघाचे विनोद रोकडे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, चोपडा न पा चे कर निरीक्षक प्रणव पाटील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक राजू बारड सह श्री शुक्ल यांचा 35 वर्षा चा कर्यांकळतील लेखा जोखा मांडला सर्वच मान्यवरांनी त्याना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन किरण पाटील सर यांनी शुक्ल विषयी चा भावना विशद करत उपस्थितांना भावुक केले.