ताज्या बातम्या
सोयाबीन व तूर बियाणे चे वाटप सभापती मंचकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

बालाजी तोरणे पाटील अहमदपूर तालुका प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024 ,2025 अंतर्गत खरीप हंगाम सोयाबीन तुर बियाणे वाटप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी माजी उपसभापती बालासाहेब पाटील आंबेगावकर, कृषी सहाय्यक एस.जी. हंगरगे, राजेंद्र चव्हाण,अकबर पठाण. संजय माने,विष्णू जगताप, शशांक कांबळे, गणपती जगताप, किशोर सूर्यवंशी, उद्धव सूर्यवंशी, लक्ष्मण जगताप, बालाजी माने,इर्शाद पठाण, गोविंद चव्हाण सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
