सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी व लिटिल ब्लॉसम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव येथे योग शिबिराची सुरूवात

धरणगाव : स्वर्गीय राहुल पाटील शैक्षणिक संस्था संचलित लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव येथे जळगाव येथील सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी येथील योगशिक्षक मा. श्री प्रितेश अर्जुन पाटील व शाळेतील क्रीडा शिक्षक मा श्री पवन सुनील बारी या योग शिक्षकांनी शाळेतील इ. 5वी ते 8वीतील सुमारे 118 विद्यार्थ्यांना योग शिक्षणाचे धडे देऊन उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांसाठी मोफत योग शिबिर आयोजित केले होते.सोमवार दिनांक 18 मार्च 2024 पासून रोज सकाळी 8:00 ते 9:00 या वेळेत योगशिक्षक मा. श्री प्रितेश पाटील सर व मा. श्री.पवन बारी सर विद्यार्थ्यांना योगा अभ्यासाचे धडे गिरवत आहेत यावेळी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे प्राचार्य मा. श्री प्रा. डॉ. देवानंद सोनार सर, प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खासबोगे, शाळेच्या संचालिका सौ ज्योती दीपक जाधव व प्राचार्य योगेश करंदीकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
