स्नेहसमेलना निमित्ताने भेटले मित्र २५ वर्षा नंतर
प.रा.विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षा नंतर अभूतपूर्व स्नेहसमेलन उत्साहात संपन्न
धरणगाव प्रतिनिधी :- धरणगाव येथील शतकोत्तरी प.रा.विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्र येत तब्बल २५ वर्षा नंतर स्नेहसमेलनाचे आयोजन करण्यांत आले,विद्यार्थी संख्या पाहता शहरातील नामांकित श्री.लॉन्स या ठिकाणी सदरील कार्यक्रम घेण्यात आला.
सर्व प्रथम दिपप्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमास सुरवात करण्यात आली . सुरुवातीला अल्पोहार झाल्यानंतर सगळ्यांनी आपला अल्प परिचय सांगून आपले कार्यक्रमाविषयी मत मांडले यानंतर सर्व मित्र व मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांचा फड रंगवला वेळे प्रमाणे सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला व यानंतर विविध खेळ घेण्यात येऊन सुमधुर संगीताच्या तालावर ठेकाही धरण्यात आला त्याच प्रमाणे काहींनी कविता,शायरी तर गाणेही सादर केले.
ठरल्या प्रमाणे यानंतर प.रा.हायस्कूल च्या प्रांगणात सर्व आमंत्रित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित राहून पुढील कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रथमतः आलेल्या गुरुजनांचा सत्कार व 1999 च्या वर्गातील विद्यार्थ्यांनकडून भेटवस्तू देण्यात आली यानंतर विद्यार्थी ओळख परिचय झाल्यानंतर मा.आदर्श माजी मुख्याध्यापक तथा कविवर्य श्री.सोनवणे सर व मा.श्री.वाघ सर यांनी 1999 च्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली तदनंतर काही विद्यार्थ्यांनि व शिक्षकांनी मा.उपासनी सर, सौ.नाईक म्याडम, मिसर सर, डी. एस.पाटील सर , बोरसे सर, व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट मोकळी करत हा सोहळा अपूर्व ठरावा अशी आठवण एकमेकांना देऊन गेले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संपदा नाईक व रोशन पांडे यांनी केले सकाळी दीपप्रज्वलन स्वनिल पाटील,विलास सूर्यवंशी,सुदर्शन भागवत,पूर्वा पाटील,हर्षदा चौधरी, रेखा पाटील,ललित जोशी,कैलास मराठे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दिवंगत मित्रांना व गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व जे मित्र अहोरात्र सीमेवर प्राणपणाची बाजी लावतात अश्या सर्व मित्रांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश पाटील,दीपक वाघमारे,रोशन पांडे,निलेश बिचवे,सुदर्शन भागवत,स्वप्नील पाटील, सावन जैन, संदीप पाटील,जगदीश परदेशी,सतीश माळी ,विवेक भदाणे,भुपेंद्र असर मुलींमध्ये रुपाली वाघ, राखी देशपांडे, संपदा नाईक,रेखा पाटील यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला सरते शेवटी आभार प्रदर्शन परेश पाठक यांनी भावनिक कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.