ताज्या बातम्या

स्वच्छता दूत कन्हेरे यांचा धरणगावात सत्कार

धरणगाव – येथे पिंपरी चिंचवड महापालिका पुणे येथील ब्रँड अँबेसिडर यशवंतराव कन्हेरे साहेब यांनी स्वच्छता अभियानांतर्गत महाराष्ट्र भ्रमण करत असताना धरणगाव येथे भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. त्यांच्या आगमन प्रसंगी धरणगाव येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडी लोहार (जिनगर) समाजातर्फे समाजाचे अध्यक्ष सुरेशआण्णा भागवत, रविंद्र भागवत, विनायक बागुल, सुभाष भागवत, दिलीप भागवत, शिरिष भागवत, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मयुर बागुल, सुदर्शन भागवत, सचिन भागवत, शेखर भागवत, रविंद्र बागुल, आनंद भागवत, गोपाल भागवत, सचिन बागुल, राजेश बागुल, रुपेश भागवत, सुनिल भागवत, शुभम बागुल, भूषण भागवत, गौरव भागवत आदी सर्व समाज बांधवांनी स्वागत केले. त्यांच्या या कार्यास व पुढील वाटचालीस क्षत्रिय गाडी लोहार समाजातर्फे सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *