धरणगाव शहर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साहात साजरा करण्यात आला

धरणगाव – यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहे या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर, वाइस चेअरमन मालती पवार मॅम, मुख्याध्यापिका वैशाली पवार मॅम, सुधर्मा पाटील सर, गणेश कोंडे सर, सुनील शाह सर, संकेत भंडारी सर व सर्व पालक रुंद उपस्थित होते.

               सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते परेडच्या सर्व कॅप्टन ला इन्वेंचरी सेरेमनी देण्यात आली. त्यानंतर परेड झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण, पोवाडा आणि देशभक्तीपर नृत्याने वेधले. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे वकृत्व सादर केल्याने उपस्थित असलेल्या सर्व पालकांनी टाळ्यांच्या गडगडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ तिसरीमध्ये शिकणारा प्रथमेश फुलपगार या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर असा शिवाजी महाराजांबद्दल चा पोवाडा म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे नृत्य करून सर्वांचे मन वेधून घेतले.

          त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहजीब मॅम यांनी केले आणि सर्वात शेवटी मृणाली सोनवणे मॅम यांनी आभार प्रदर्शन केले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *