ताज्या बातम्या
हडस्ती येथे राहत्या घरी बेडरुममध्ये गळफास घेऊन २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

हिंगणघाट प्रतिनिधी सचिन महाजन
हिंगणघाट – तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हडस्ती येथे ९ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरी बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक सोनम लक्ष्मणराव देवुरकर वय २२ वर्षे राहणार हडस्तीहिने राहते घरी बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक हि काही महिन्यापासुन मानसिक आजारी होती अशा फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन वडनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असुन पुढील ठाणेदार संजय मिश्रा यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
