ताज्या बातम्या

हिंगोना येथे सद्गुरू कॉलनीत घाणीचे साम्राज्य ग्रामस्थांचे हाल ; गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन

प्रतिनिधी- विनायक पाटील

हिंगोना तालुका यावल येथील सद्गुरू कॉलनी मध्ये अतिशय घाणीचे साम्राज्य झालेले असून रहिवासी ठिकाणी मोठमोठे खड्डे पावसाळ्यात. पाण्याचे डबके साचलेले आहे .तरीसुद्धा ग्रामपंचायत मार्फत .कोणतीच उपाययोजना केलेली नाही जाणून बुजून .ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे .कॉलनीत राहणाऱ्यांचा लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कॉलनीत जाण्यासाठी सुद्धा साचलेल्या पाण्यामुळे लोकांना रस्ता नाही विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडून . स्वछता अभियान राबविण्यात येत आहे .तरीसुद्धा सद्गुरु कॉलनी मध्ये कोणतीच प्रकारची .स्वच्छता ग्रामपंचायत मार्फत राबवली जात नाही .पूर्णपणे कॉलनीला वाऱ्यावर सोडलेले आहे .यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .यासाठी .ग्रामपंचायतला . वेळो वेळी निवेदन देण्यास आले आहे तरी सुद्धा आज पर्यंत कोणतीच दखल ग्रामपंचायत प्रशासनानेघेतलेले .नाही यासाठी कॉलनीतील रहिवासींनी .गटविकास अधिकारी यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे सदर गावात मलेरिया डेंगु याची लागण सुरू आहे यासाठी कोणतीच जीवित हानी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी निवेदन वरिष्ठांना दिले यासाठी सद्गुरु परिसरात तात्काळ उपाययोजना करावी .आणि घाणीचे साम्राज्य दूर करावे व साचलेले पावसाचे पाणी मार्गी लावावे .जेणेकरून सद्गुरु कॉलनी मधील ग्रामस्थांचे अडी अडचणी . दूर व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदनावर पंकज कोळी . हिरामण जावळे . किसण सोनवणे . बबन पाटील .विलास कुरकुरे . अविनाश गाजरे . दिपक चौधरी प्रमिला कुरकुरे . विजय राणे . किशोर कुरकुरे . कैलास गाजरे . मोहन महाराज . सुनिल धोबी आदी कॉलनी मधील राहणाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *