ताज्या बातम्या

होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून पिंप्री सोनवद जि.प. गट येथे केंद्र व राज्य सरकारच्या खोट्या आश्वासनांचा भांडाफोड

धरणगाव – राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या “होऊ द्या चर्चा” अभियानांतर्गत धरणगाव तालुक्यातील पिप्रि सोनवद जि प गट येथे उबाठा सेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख मा नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी संघटक राजेंद्र ठाकरे ता प्रमुख जयदीप पाटील मा जी प उपाध्यक्ष जानकीराम पाटील मा सभापती दिपक सोनवणे शहर प्रमुख भागवत चौधरी मा नगरसेवक जितू धनगरयांच्या प्रमुख उपस्थित “होऊ द्या चर्चा” कार्यक्रम संपन्न झाला. “होऊ द्या चर्चा” कार्यक्रमाप्रसंगी वैशाली सुर्यवंशी या म्हणाल्या की, सन – २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला. मतदार राजांची घोर फसवणूक झाली, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, उत्पन्नाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही, खरेदी केंद्र बंद पडलेले, आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पळून आहे, आरोग्याच्या सुविधा कोळमळल्या, इमारती उभ्या केल्यात, डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ भरती नाही, साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाहीत, सर्पदंश, श्वान दंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे केले, काळे धन भारतात आले नाही, पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैैराश्य निर्माण झाले, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे, नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे, महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे भाजपा सरकारचं ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्मार्ट सिटी झाली, ना बुलेट ट्रेन धावली, महाराष्ट्रात महाआघाडीचे शासन होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार ना धनगर आरक्षण मिळाले ना शिवस्मारक झाले ना बाबासाहेब यांचे स्मारक झाले कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले तरी देखील भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले येणाऱ्या २०२४ मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल भाजपापासून देशाला वाचवावे लागेल भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं मत शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ऍड शरद माळी यांनी केले. . यावेळी उपस्थित उपतालुका प्रमुख कृपाराम माळी मुसळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रघुनाथ नाना पाटील , ईश्वर धोबी , शिवा महाजन, रमेश पांडे, मनोज पांडे, योगराज धनगर, भिका धनगर, हेमराज बडगुजर , संतोष महाजन , लीलाधर पाटील नंदलाल पाटील नरेंद्र शिरसाठ गजानन महाजन विनोद रोकडे , आरविद चौधरी, गोपाल चौधरी सह शिवसेना युवासेना गावखेड्यातील असंख्य नागरिक बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *