ताज्या बातम्या

होमगार्ड रमेश महाजन यांचा निरोप समारंभ

धरणगांव प्रतिनिधी / विनोद रोकडे

धरणगांव होमगार्ड पथकातील होमगार्ड जवान श्री रमेश हेमलाल महाजन हे सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने धरणगांव पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री पवनकुमार देसले यांनी शोल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होमगार्ड रमेश महाजन हे 1980ते 90 चा दशकातील धरणगांव शहरातील कुस्ती क्षेत्रातील नामांकित पैलवान होते त्यांनी होमगार्ड दलातील, जिल्ह्य़ातील राज्यातील व इतर राज्यातील अनेक महत्त्वाचे कर्तव्य केले आहे ह्या छोटेखनी कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ साहेब पो.उपनिरीक्षक संतोष पवार होमगार्ड तालुका समादेशक ईश्वर महाजन अं.लिपिक जानकीराम पाटील दिपक पाटील पोलीस हजेरी मेजर दिपक पाटील सुमित बाविस्कर सत्यवान पवार समाधान पाटील होमगार्ड अरूण सातपुते दिपक वैदू सह अनेक पोलीस व होमगार्ड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *