३५ व्या कबड्डी किशोरी गट अजिंक्यपद स्पर्धेत वाघोडच्या शिव स्पोर्ट्स क्लब ने मारली बाजी

रावेर प्रतिनिधी / कमलेश पाटील
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व सर्वोदय क्रीडा मंडळ असोदा यांच्या संयुक्त विद्यमानाने असोदा या ठिकाणी झालेल्या कै. यशवंत रामचंद्र चौधरी चषक जळगाव जिल्हा किशोरी गट अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत रावेर तालुक्यातील वाघोड गावातील शिव स्पोर्ट्स ने प्रथम क्रमांक पटकावट घणघणीत यश मिळवले
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता कबड्डी संघाचे साखळी पद्धतीने सामने घेण्यात येऊन त्यामधून बाद फेरीमध्ये आठ संघाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संभाव्य वीस खेळाडूंची निवड करण्यात आली.होती यावेळी आमनेसामने गटातील सर्वोदय क्रीडा मंडळ & शिव स्पोर्ट्स क्लब 26 गुणांनी शिव स्पोर्ट्स क्लब विजयी झाले शिव स्पोर्ट क्लब & आर आर विद्यालय जळगाव शिव स्पोर्ट्स क्लब या गटाने 20 गुणांनी विजय मिळवला,कॉटर फायनल मध्ये स्वामी स्पोर्ट्स क्लब & शिव स्पोर्ट्स क्लब शिव स्पोर्ट्स या गटाने 15 गुणांनी विजयी झाले व सेमी फायनल मध्ये शिव स्पोर्ट्स क्लब & क्रीडा रसिक जळगाव शिव स्पोर्ट्स 17 गुणांनी विजय झाला नंतर फायनल मध्ये सरदार जी जी स्पोर्ट्स & शिव स्पोर्ट्स क्लब शिव स्पोर्ट्स क्लब यांनी 13 गुणांनी विजय मिळवला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिव स्पोर्ट्स क्लब वाघोड तर द्वितीय क्रमांक सरदार जी जी मंडळ रावेर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक क्रीडा रसिक मंडळ जळगाव यांनी पटकाविले.
रावेर तालुक्यातील वाघोड येथील शिव स्पोर्ट क्लबचे संचालक मंगेश महाजन सर यांनी शिव स्पोर्ट्स च्या विद्यार्थीकडून अर्थक परिश्रम घेऊन बाजी आपल्या पदरात पाडून घेतल्याने सर्वच वर्गातून अभिनंदन होत आहे
