ॲड.अनिल देविदास नंन्नवरे यांची अ.भा.कोळी समाज (रजि.) नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती

जळगांव – बांभोरी (प्र.चां.) ता.धरणगांव येथील रहिवाशी ॲड.अनिल देविदास नंन्नवरे यांची दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी लाल बहादूर शास्त्री किसान गन्ना संस्थान,लखनऊ,उत्तरप्रदेश येथे अखिल भारतीय कोळी समाज(रजि.) नवी दिल्ली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार तथा मा.लोकसभा अध्यक्ष विरेंद्र कश्यप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत भारत देशातून बाविस प्रदेशांतून प्रदेश अध्यक्ष आलेले होते या बैठकीत ॲड.अनिल नंन्नवरे यांची राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी मा.केंद्रीय मंत्री भानूप्रताप सिंग,उत्तर प्रदेश चे श्रम व विकास मंत्री मनोहरलाल कोली हे उपस्थित होते.
ॲड.अनिल नंन्नवरे हे अखिल भारतीय कोळी समाज (रजि.) नवी दिल्ली संघटनेत गेल्या वीस वर्षांपासून कार्य करत आहेत सदस्य, युवक जिल्हा अध्यक्ष, खांदेश युवक कार्याध्यक्ष, खांदेश उपाध्यक्ष, प्रदेश सचिव ते राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असा त्यांचा प्रवास झाला आहे.त्याच्या निवडीचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, मा.जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, प्रदेश अध्यक्ष परेशभाई कोळी,जळगांव जिल्हा अध्यक्ष प्रवीणकुमार बाविस्कर,जिल्हा संघटक गोपालशेठ नंन्नवरे, रामचंद्र सोनवणे, धनराज साळूंखे, ॲड.स्मिता झालटे, मंदाताई सोनवणे, ॲड.रमाकांत सोनवणे, सुनिल नंन्नवरे, भिकन नंन्नवरे आदींनी अभिनंदन केले आहे.