शिक्षण

आ. विक्रम काळे यांच्या निधीतून आठ जिल्ह्यात 3300 शाळांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न

AURANGABAD – आज मंगळवार 26 एप्रिल रोजी औरंगाबाद शहरातील एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन येथे, पुस्तक वितरण चा कार्यक्रम आमदार विक्रम काळे यांनी आयोजित केला आहे सदरील कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.सदरील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उपस्थिती दाखवून उपस्थित यांना सांगितले की पुस्तक ही काळाची गरज असून मोबाईलच्या काळात विद्यार्थी पुस्तक विसरत चालले आहे, वाचाल तर वाचाल, ही काळाची गरज ठरली असून विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाकडे लक्ष देण्याची गरज आज रोजी निर्माण झाली आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे. सदरील कार्यक्रमाला आमदार विक्रम काळे व आमदार सतीश चव्हाण यांचे कौतुक ही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली असून त्याच बरोबर शिक्षक संघटनेच्या परिषदेमध्ये शिक्षकांच्या विविध समस्यांचे समाधान करणार असल्याचेही त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शहरात मराठवाड्यातील शाळेच्या ग्रंथालयांना पुस्तक वितरण आणि मुप्टाचे सहावे रौप्य महोत्सवी अधिवेशन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.       शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्यात येणार आहेत. खासदार पवार आणि अजित दादा पवार यांच्या हस्ते एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला आहे, अध्यक्षस्थानी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम होते तर, यावेळी मंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे, एमजीएमचे विश्‍वस्त अंकुशराव कदम, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, माजी आमदार अमरसिंह पंडीत, डॉ. कल्याण काळे, कैलास पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा) चे सहावे रौप्य महोत्सवी अधिवेशन तापडिया मैदानावर दुपारी होत असून खासदार पवार, मंत्री अजित पवार, राजेश टोपे, धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित उपस्थित राहणार आहे.पुस्तक वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आज रोजी एमजीएम कॅम्पस येथे संपन्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *