ताज्या बातम्या
त्रिवेणी जनार्धन गव्हाळे नेट परीक्षा उत्तीर्ण
बुलढाणा | चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रामपूर येथील त्रिवेणी जनार्धन गव्हाळे ही नुकत्याच झालेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे . तिचे वडील वेस्टर्न कोल फील्ड मध्ये सरकारी कर्मचारी असून आई रंजना गव्हाळे गृहिणी यांचे सह बुलढाणा जिल्हा मोताळा तालुक्यात शेलगाव बाजार येथील तिचे आजोबा हरिभाऊ सुरळकर यांचे सह मामा आणि सर्वच गुरुवर्य यांनी तिला नेहमी शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिलं.
तिचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यात झाले असून, माध्यमिक शिक्षण जळगाव तर एम ए मराठी पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. विद्यापीठातील मराठी विभाग प्राध्यापक वृंद आणि सहकारी यांचे तिला अनमोल सहकार्य लाभले आहे.
तिचे या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून तीचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.