ताज्या बातम्या

धरणगावात “सत्यपाल ची सत्यवाणी”

धरणगाव प्रतिनिधी –

धरणगाव : येथील मराठे ट्रेडिंग कंपनीचे संचालक भगवान भिवसन मराठे यांचे सुपुत्र श्री. बबलू व सौ.टिनाबाई यांना कन्या रत्न प्राप्त झाल्याबद्दल नामकरण सोहळाचे औचित्य साधत आज दि.११ नोव्हे, २०२२ शुक्रवार रोजी सायं. ०७:०० वाजता बजरंग चौक, पारोळा नाका धरणगाव येथे प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. 

         महाराष्ट्रातील कृतिशील प्रबोधनकार म्हणून सत्यपाल महाराज सुपरिचित आहे. त्यांनी देशभर सामाजिक विषमतेविरुद्ध सप्तखंजिरीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संत व महापुरुषांच्या विचारधारेचा अविरत संघर्षातून प्रचार प्रसार करून महापुरुषांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले व करीत आहेत. शिक्षणाचे महत्व, स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, सामाजिक विषमता, शिक्षणाचे बाजारीकरण, हगणदारी मुक्त गाव, व सामाजिक विषयी सर्व सामान्यांना जागरूक करून जनजागृती केली. बऱ्याच वर्षानंतर धरणगाव परिसरात राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे जाहीर किर्तन होत आहे. तरी नागरिकांनी ‘ सत्यपालची सत्यवाणी ‘ या प्रबोधनपर किर्तनासाठी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन भगवान भिवसन मराठे आणि परिवाराकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *