गुन्हेगारी

धक्कादायक : रुग्णवाहिकेचा गैरवापर करीत रुग्णवाहिकेतून चक्क प्रवासी वाहतूक

जळगाव – शासन राज्यात व देशात आपत्कालीन सेवेसाठी नागरिकांची सोय व्हावी या दृष्टीने रुग्णांना तातडीने उपचार व्हावेत यासाठी शासनाच्या विविध योजनांद्वारे करोडो रुपये खर्ची घालून विविध रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असते. देशात व राज्यात आरोग्यावर मोठा निधी हा यासाठी राखीवदेखील ठेवण्यात येत असतो. तरी देखील काही रुग्ण हे उपचाराभावी दगावत असल्याच्या अनेक घटना आपल्याला बघायला मिळतात. यासाठी शासनाची उरली सुरुली जागा भरून निघण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढाकार घेवून हि उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करीत असतात.

इतकेच नव्हे तर काही राजकीय नेत्यांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनहित लक्षात घेवून नागरिकांच्या सेवेसाठी मोठ्या थाटामाटात रुग्नावाहीकांचे उद्घाटन करण्यात येते. परंतु काही हौशी नौशी पुढारी या रुग्नावाहीकांचा दुरुपयोग करून आपल्या कार्यकर्त्यांच्या मर्जीसाठी या रुग्नावाहीकांचा दुरुपयोग करतांना दिसून येतात. अनेकदा रुग्नावाहीकांचा वापर हा काळ्या धंद्यासाठी केला गेल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत.  

असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात घडला आहे. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून एका रुग्णवाहिकेचा वापर हा चक्क प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याचे यात दिसून येत आहे. एका रुग्णवाहिकेत अक्षरशः प्रवासी कोंबून कोंबून भरले असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. अश्या प्रकारे रुग्णवाहिकेचा वापर हा प्रवासी वाहतुकीसाठी करणे कितपत योग्य आहे  ? अश्या वेळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आणि गरज असलेल्या रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास एखाद्याचा जीव गेला तर त्यास कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न उभा राहत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ ची सत्यता पडताळणी केली असता सदर रुग्णवाहिका हि धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद सदस्याची असल्याची माहिती प्राप्त होत आहे. सदर व्हिडीओ १६ ऑगस्ट च्या मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरातील चोपडा रस्त्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चित्रित केला आहे. सदर रुग्णवाहिका हि चोपड्याच्या देशेकडून धरणगावहून पुढे पिंप्री कडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रुघावाहीकेच्या अश्या प्रकारे होत असलेल्या बेकायादेशी वापराबाबत जिल्हा शल्यचीकीत्सक किरण पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता, अश्या प्रकारे रुग्णवाहिकेचा वापर होत असल्यास ते बेकायादेशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता सदर रुग्णवाहिका चालक व रुग्नावाहीकेवर प्रशासन काय कारवाई करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *