गुन्हेगारी

धरणगावात पत्ते खेळण्याच्या वादातून हाणामारी, पत्त्यांचे डाव उधळून लावण्याची मागणी

जळगांव – जिल्ह्यातील धरणगावात संजय नगर भागात पत्त्यांचा डाव सुरु असतांना दि. ३० वार शनिवार रोजी मध्यरात्री ०२.०० वाजेच्या सुमारास पत्ते खेळण्याच्या वादातून काही जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत फायटरचा वापर करीत एकाला जबर मारहाण करण्यात आले. या संदर्भात आज रविवार रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्त्यांचे डाव उधळून लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

खान्देशात अक्षय तृतीयेचा सणाला खूप महत्व असते. या सणात सुना आणि मुली या आप आपल्या माहेरी जावून माहेरच्या मैत्रिणींच्या गाठी भेटी घेत असतात. या दिवसात झोका खेळून आपला आनंद साजरा करीत असतात. तसेच आंब्याचा रस आणि पुरीचा आस्वाद घेत असतात. या प्रथांसोबतच काही कु प्रथा देखील बघायला मिळतात. या दिवसात पुरुष मंडळीचे गावागावात, शहरातील विविध भागात पत्त्यांचे डाव रंगताना पाहायला मिळतात. मात्र कायद्याच्या दृष्टीने यास मान्यता नसल्याने या कु प्रथा कालांतराने कमी होत चालल्या आहेत. परंतु तरी देखील काही भागात या प्रथा आजही पाळल्या जात आहेत.

खान्देशातील धरणगाव हे या कु प्रथेसाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेले आहे. यावर पोलिसांकरवी अनेक वेळा कारवाया देखील झाल्यात परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रथा मात्र बंद होवू शकलेल्या नहीत.

धरणगाव शहरातील विविध भागात सध्या पत्त्यांचा डाव रंगला आहे. असाच प्रकार संजय नगर भागात बघायला मिळत होता. मात्र याठिकाणी अक्षय तृतीयेच्या सणाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे. दि.३० एप्रिल वार शनिवार रोजी मध्यरात्री ०२.०० वाजेच्या सुमारास हनुमान मंदिरावर पत्त्यांचा डाव सुरु असतांना पत्ते खेळण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जावून हाणामारी झाली आणि हाणामारीत फायटरने एकाला मारहाण करण्यात आली. यात गणेश शांताराम माळी हा युवक जखमी झाला होता. त्यास जळगाव येथे हलविण्यात आले होते. त्याने आज धरणगाव पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिली असून पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरात सुरु असलेल्या या कु प्रथा बंद करण्यात याव्यात व हे दरवर्षी जत्र्यासारखे भरणारे पत्त्यांचे डाव उधळून लावण्यात यावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *