जळगांव जिल्हाधरणगाव ग्रामीणधरणगाव शहर

धरणगाव तालुका दिव्यांग सेना उप तालुका प्रमुख सुरेश पवार यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

धरणगाव – तालुका दिव्यांग सेनेच्या उपतालुका प्रमुख पदी दोनगाव येथील रहिवासी सुरेश पवार यांची तालुका उपप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

या प्रसंगी दिव्यांग सेनेचे प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,धरणगाव तालुका प्रमुख संजय पाटील सर,महिला उप तालुका प्रमुख सरला सोनवणे,धरणगाव प्रमुख रवी काबरा,रमेश चौधरी, लीलाधर नन्नवरे,कैलास सावंत जामगाव,शिवाजी पाटील,निवृत्ती पाटील, सुरेश अहिरे जांभोरा, पटेल शबिर साळवा, ज्योती नन्नवरे चोरगाव, चांदसर येथील सरपंच सचिन पवार,आबाभाऊ महाजन,नवल राजे पाटील साहेब अमळनेर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *