जळगांव जिल्हा

धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादी ला खिंडार : उपजिल्हा अध्यक्ष शरद पाटील ( निशाणे ) यांचा शिंदे गटात प्रवेश

बाळासाहेब शिवसेनेला मिळणार बळ

धरणगाव – उपजिल्हा अध्यक्ष शरद पाटील (निशाने) यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला आहे. धरणगाव तालुक्यातील निशाने येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य व जळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार पाटील साहेब यांच्या हस्ते मुंबई येथील गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यावर प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थिती शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार आहे. शरद पाटील यांच्या प्रवेशाने अनेक युवा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळ फार मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या शिवसेना प्रवेश करणार असून धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

शरद पाटील हे धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील रहिवासी असून ते एक उत्तम कापूस व्यापारी आहेत तसेच ते राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष देखील आहेत. त्यांचा धरणगाव तालुक्यात मोठा जनसंपर्क असून येणाऱ्या काळात बाळासाहेब शिवसेना बळकट करून धरणगाव तालुक्यातील अजून राष्ट्रवादी चे शेकडो कार्यकर्ते शरद पाटील यांच्यावर विश्वास ठेवून बाळासाहेब शिवसेना मध्ये प्रवेश करणार असून थोड्या दिवसात हा प्रवेशाचा कार्यक्रम होईल असे प्रतिपादन शरद पाटील यांनी केले आहे.

याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष सकल मराठा समाजाचे नेते पी एम पाटील सर, तिळवण तेली समाजाचे बाळासाहेब शिवसेनेचे पदाधिकारी हेमंत चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जि प सदस्य पवन भाऊ सोनवणे, तालुका उपप्रमुख मोती अप्पा पाटील, सोनवदचे ग्रामपंचायत सदस्य बबलू पाटील, आबा महाजन, निलेश पाटील, गुलाबराव पाटील साहेब यांचे स्वीय सहायक गोविंद भाऊ पाटील, एकनाथ माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *