पिंप्री खु.येथील लिटल चॅम्पस इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
धरणगाव – तालुक्यातील पिंप्री खु.येथे आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त लिटल चॅम्पस इंग्लिश मीडियम स्कूल पिंप्री खु.येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आदरणीय डॉक्टर श्री.गोपाल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष अतिथी सेवानिवृत्त श्री.प्रमोद चौधरी, श्री.गोरख मोहकर, श्री विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त बालगोपालांनी देशभक्तीपर गाणे, भाषण व नृत्य सादर केले. प्रसंगी बॉर्डर या चित्रपटातील ‘संदेसे आते है’ या गाण्यावर विद्यार्थ्यांचा डान्स पाहून प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वतंत्र भारताचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करताना १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी शाळेत झालेल्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या वेळी पालक वर्गाने तिरंगा वेशभूषेत येऊन पिंप्री परिसरात वेगळाच उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश दामू बडगुजर, स्कूलच्या प्रिन्सिपल सौं.शोभांगी बडगुजर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.